माझ्या आज २ कविता चोरीला गेल्यात… यावर काय उपाय आहे कि नाही ……क़ि आम्ही कविता पोस्ट करणं बंद करावं
फेसबुक वरील पिल्लू तुझ्यासाठी काय पण या पेज चे संचालक सागर कावडे यांनी त्या चोरल्यात माझ नाव काढून पेस्ट केल्यात
त्यांनी या बद्दल माफी मागितली पण पुढे काय आता… मला प्रश्न पडलाय मी या पुढे कविता पोस्ट करू कि नको ……
मला खूप वाईट वाटतंय याचं ……. का हे असं करतात ? काय भेटतं कवीच नाव काढून स्वताच नाव लावताना ?
आम्हाला काय फ़ेमस नाही व्हायचं , पण यार तुम्ही अस करता तर ते आमच्या भावना दुखावतात…
त्या आमच्या feelings असतात ज्या आम्ही कागदावर उतरवतो …… आणि अजून कोणालातरी असाच होत असावं
या अर्थाने त्याचही दुख कमी होण्यासाठी या व्यक्त होण्यासाठी त्या पोस्ट करतो…
आज माझ कविता करण्या पासून मन उडालंय………