Author Topic: प्लेझर बाँक्स 1  (Read 37999 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
प्लेझर बाँक्स 1
« on: January 25, 2009, 11:13:47 AM »
संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

It is better to have loved and lost than never to have loved at all !

अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

जोपर्यंत स्व:तच्या विचारांचा शोध स्वतलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेलं असतं सगळ्यांचं.

जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तिला पसंत करायचं, त्या व्यकितबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरिर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा.हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.

Love decides what is wrong, instead of who is wrong.

माणुस नावाच्या एका अवाढव्य, अनाकलनीय यंत्राचा सेफ़्टी व्हाल्व्ह शब्द आणी संवाद हा आहे.

पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का?मैत्री म्हटलं की खरं तर हीशोब, गणितं वगैरे व्यवहारीक शब्द टीकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?

कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.

जो शब्द नाकारतो तो विचारच नाकारतो.

मैत्री म्हटलं की काय असावं काय नसावं ह्याचं चिंतन करावं.

प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावत होतं. हे मनाचं प्रकरण छान आहे. जागा न सोडता ते हजारो मैल भटकतं आणि सगळ्यांना भेटतं. पण शरीर त्यापैकी एक दोन ठीकाणीच जाऊ शकतं.

कोणत्याही नव्या "अनुभवाला" समोर जाताना प्रत्येक मनात एकमेव ईच्छा असते. तो अनुभव चांगला असावा. अपेक्षापुर्ती करणारा असावा.

जो माणुस जीवनाला कंटाळलाय, वैतागलाय त्यला एवढचं विचारावसं वाटतं "राजा, तू कधि लताचं गाणं ऐकलयंस? ' रसिक बलमा ' किंवा ' ओ बसंती ' डोळे मिटुन तंद्रित ऐकलयसं. आणी जर नसलसं तर ऐक.पुन्हा पुन्हा ऐकत रहा. तुला जगावसं वाटेल.आणी असं वाटत असतानाच तु वपुंच्या कथा ऐक. तुला कधिच मरावसं वाटणार नाही.

Marathi Kavita : मराठी कविता

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
Re: प्लेझर बाँक्स 1
« Reply #1 on: January 25, 2009, 11:14:52 AM »
दोन माणसांना जवळ आणू असं निव्व्ळ ठरवून ती एकमेकांच्या जवळ येत नाहीत. ती मग सख्खी भावंड असली तरी! रंगाच्या पेटीत कितीतरी रंग एकत्र असतात. एकाच मातीतून बनवलेले रंग. एकाच पेटीत राहणारे. पण त्यातले फार थोडे दुस-या रंगात चांगले एकरुप होतात. ह्या कोणी का? म्हणून विचारले तर काय सांगायचं?

एका मोटारीखाली एक भली मोठी घूस सापडलीं. जरा वेळ ती तडफडत असताना तिच्या अंगावरून दुसरी मोटर गेली. मांस बाहेर फेकल गेल. त्यानतर तिसरी. मग चौथी मग पाचवी.
प्रत्येक वेळी तीच रस्त्यावरच अस्तित्व हळू हळू नष्ट होत होत. एक -दोन डबल डकेर्स आणि चार-पाच ट्रक्स गेल्यानंतर तर तिची कातडी डांबरी रस्त्याशी एकरूप झाली. शेवटी शेवटी ती रस्त्याचा पापुद्रा बनली. दु:ख भूतकालाशी अशीच पापुद्रा बनून रहातात
तेंव्हा आपण "काळासारख औषध नाही " म्हणतो काय???

"संवाद दोनच माणसांचा असतो त्यात तीसरा आला की त्याच्या गप्पा होतात."

दू:ख पराभवाचे नसते, फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो त्याच दू:ख होत. कर्णाची बाजु अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आल त्याचे वाईट वाटते.

« Last Edit: January 25, 2009, 03:32:22 PM by talktoanil »

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 367
  • Gender: Male
Re: प्लेझर बाँक्स 1
« Reply #2 on: January 25, 2010, 03:11:55 PM »
दोन माणसांना जवळ आणू असं निव्व्ळ ठरवून ती एकमेकांच्या जवळ येत नाहीत. ती मग सख्खी भावंड असली तरी! रंगाच्या पेटीत कितीतरी रंग एकत्र असतात. एकाच मातीतून बनवलेले रंग. एकाच पेटीत राहणारे. पण त्यातले फार थोडे दुस-या रंगात चांगले एकरुप होतात. ह्या कोणी का? म्हणून विचारले तर काय सांगायचं?

एका मोटारीखाली एक भली मोठी घूस सापडलीं. जरा वेळ ती तडफडत असताना तिच्या अंगावरून दुसरी मोटर गेली. मांस बाहेर फेकल गेल. त्यानतर तिसरी. मग चौथी मग पाचवी.
प्रत्येक वेळी तीच रस्त्यावरच अस्तित्व हळू हळू नष्ट होत होत. एक -दोन डबल डकेर्स आणि चार-पाच ट्रक्स गेल्यानंतर तर तिची कातडी डांबरी रस्त्याशी एकरूप झाली. शेवटी शेवटी ती रस्त्याचा पापुद्रा बनली. दु:ख भूतकालाशी अशीच पापुद्रा बनून रहातात
तेंव्हा आपण "काळासारख औषध नाही " म्हणतो काय???

"संवाद दोनच माणसांचा असतो त्यात तीसरा आला की त्याच्या गप्पा होतात."

दू:ख पराभवाचे नसते, फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो त्याच दू:ख होत. कर्णाची बाजु अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आल त्याचे वाईट वाटते.
chaan

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):