Author Topic: ऐक सखे  (Read 5732 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
ऐक सखे
« on: January 25, 2009, 11:49:08 AM »
वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक. एका निराळ्या पद्धतीने छापलेले, गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे, 'अरेबियन नाईट्स' सारखे त्याचे स्वरूप आहे.
वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आद्रतेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौदर्य आहे, तोरा आहे .....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Archana25

  • Newbie
  • *
  • Posts: 10
  • Gender: Female
मैत्री आहे की प्रेम
« Reply #1 on: November 11, 2010, 12:30:01 PM »
मैत्री आहे की प्रेम
ओळखत जरी असलो एकमेकना एक वर्षापासून पण कधी एकमेकासमोर प्रेमाच्या गोष्टी केल्याच नाही.
का?त्याने बोलवल्यावर न विचार करता त्याला भेटायला जाते.
ही फक्त मैत्री आहे की प्रेम.
क?जेव्हा घरी जाण्याची वेळ येते तेव्हा एकटे सोडायला तो घाबरतो.
काळजी तर मित्र मैत्रिणी सुधा घेतात.
क? दूर जाताच एकमेकना विचारावे तू व्यवस्तीत पोहचलास ना.
भेट जरी दररोज होत नसली तरी विचार मात्र त्या व्यक्तीचाच करतो.
का? आम्ही दोघे एकमेकना सांगू शकत नाही की खरच मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.
का? भेटल्यावर मात्र प्रत्येक क्षण अविस्मरणीय जगायचा.
का?मी एखाद्या मुलाबद्ल सांगितल्यावर तो इग्नोर करतो
का? त्याने कोणत्या मुलीबद्दल विचारल्यावर मी सुधा माझ्या भावना लपवून ठेवते.
का? अस वाटत संपूर्ण आयुष्य त्याच्या मिठीतच घालवाव
भावना मात्र दोघांनाही माहिती आहे पण व्यक्त करायला आम्ही दोघे सुधा का घाबरतो.
का आम्ही प्रेम व्यक्त केल्यावर आमच मैत्रीच नात दूरावेल का?.
posted by: Archana