भिडे, श्रीखंडे, मोघे इत्यादि माणसं तुमच्याआमच्यातली,
जरा टाचा उंच करून हात वर केले की,
जी फुलं आपल्या हाताला येतात,
ती फुलं जवळची वाटतात.
डोळे फुलून टाकणार्या उंचीवरची फुलं आवडतात;
पण तिथवरचं अंतर आपण कधीच कापू शकणार नाही.
ह्या खुजेपणाची जाणीवही उंचावरची फुलं जागी करतात.
पूज्य बाबा आमटे, जयंतराव नारळीकर, दुर्गाबाई भागवत
ह्यांच्यासारखी माणसं आदरणीय आहेत
हे कोण नाकारेल?
वंदन करून तिथं खालीच बसायचं,
तिथवर कोण पोचणार?
पण थोड्या प्रयत्नानं आपण भिडे होऊ शकतो किंवा
जिथे तार जुळली असेल तिथवर जाऊ शकतो.
'चिअर्स'चं लेखन ह्याच दृष्टिकोनातून.