Author Topic: कर्मचारी  (Read 3914 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
कर्मचारी
« on: January 25, 2009, 11:53:08 AM »
तुम्ही
दुधाच्या, रेशनच्या, साखरेच्या,
तिकिटांच्या, बसच्या
रांगेत तासन तास उभे राहता.
चालती गाडी पकडता.
लोकलला लोंबकळता.
लेटमार्क चुकवण्यासाठी.
जीव गहाण ताकता.
साहेबाची बोलणी खाता.
कॅंटीनचा बेचव चहा पिता.
संसारात तर नाना आपत्ती
सहन करता.
आज हे नाही. उद्या ते नाही.
मोर्चा, हरताळ, संचारबंदी, उपोषण
सगळं हलाहल पचवता.
तरीही
तुम्ही
हसता, हसवता.
गाडीत उभ्या उभ्या पत्ते खेळता.
राजकारणावर
हिरीरीने बोलता.
एखाद्याला मोरू बनवून आनंद
निर्माण करण्याचा
प्रयत्न करता.
बेचव चहाच्या पैजेवरही
खूश होता.
यू आर सिम्प्ली ग्रेट!
असे तुम्ही जातीवंत
कर्मचारी

हा कथासंग्रह म्हणायचा नाही, पण ते
काही खरं नाही. हा आहे आरसा.
सर्वांना प्रेम करायला लावणारा आरसा.
उद्या रिटायर होणारा हेडक्लार्क पण
लिफ्ट मजल्यावर जाता जाता
तिथल्या आरशात डोकावतो.
तसाच हा आरसा.

Marathi Kavita : मराठी कविता