चालायला शिकणार मुलाच फक्त स्वतःच्या पायावर चालत. ते जसजस मोठ व्हायला लागत तस तस ते स्वतः ल पाय आहेत हे विसरायला लागत. नंतरच्या आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात. पात,ऐपत,प्रतिष्ठा,पैसा,सत्ता,कीर्ती,यश,लौकिक,प्रसिद्धी,राजकारण,स्पर्धा,पक्ष,जात,धर्म,परंपरा,रूढी........पायाच पाय. ह्या पायांच्या जोरावर तो आयुष्यभर लाथाळी करतो. हळूहळू एकेक पाय गळायला लागतात."सत्ता" हा एक महत्वाचा पायाच जाताना खूपच पाय नेतो.वार्धक्य जवळ येईतो. सगळ गेलेलं असत.तो पर्यंत आपल्याला स्वतः चे पाय होते ह्याच विस्मरण झालेलं असत,ज्यामुळे तो माणूस आहे हे ओळखल जात होत. वार्धक्यात गुडघे गेले अस म्हणायचं.खर तर सगळे पायाच गेलेले असतात. बहुसंख्य माणसांना कशाची ना कशाची ग्यारंटी हवी असते. माणूस ग्यारंटी मागतो,त्यामागे खरच काय धारणा असेल ? छापलेला अंगठा शिउन देणार्या चांभाराकडेही एक रुपयाच्या बदल्यात आपल्याला हमी हवी असते......तो शांतपणे सांगतो; " साहेब चपलेचा अंगठा किती टिकेल, ते चालण्यावर आवलंबून हाय!" हे उत्तर आपल्याला व्यावसायिक चातुर्याच वाटत. आम्ही कसेही चालतो,चप्पल कशी हि वापरली,तरी ती "टिकली पाहिजे" हा चप्पल घेणार्याचा हेतू. चप्पल काय-आणि संसार काय---तो कुणाच्या हातात पडतो त्यावर अवलंबून . बायकोचा उपयोग मी कसाही करीन , तीन चांगलाच वागण्याची ग्यारंटी दिली पाहिजे.