Author Topic: राजकारण कशात शिरेल याचा काही नेम नाही !!  (Read 710 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
राजकारण ते ही करतात
राजकारण हे ही करतात
मात्र त्यांच न् ह्यांच सेम नाही
राजकारण कशात शिरेल
याचा काही नेम नाही !! धृ !!

आतंकवाद्याच्या फाशीत
जाती-धर्माच्या राशीत
सणा-सुदीच्या कुशीत
शिरते राजकारण
कारण राजकारणाला कुठला धर्म नाही

संसदेच्या गदारोळात
पुरस्काराच्या वादात
आंदोलन अन् मोर्चात
शिरते राजकारण
कारण राजकारणाला कुठला पक्ष नाही

शेतकऱ्यांच्या आत्महत्येत
स्री-पुरुषांच्या समानतेत
स्वैराचाराच्या स्वातंत्र्यात
शिरते राजकारण
कारण राजकारणाला कुठला पंथ नाही

राजकारण शिरतं चालण्यात
राजकारण शिरतं बोलण्यात
माणसाच्या वागण्यातही
शिरते राजकारण
कारण राजकारणाला कुठले पाय नाही
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):