Author Topic: चर्चा चालू आहे!"  (Read 782 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
चर्चा चालू आहे!"
« on: December 02, 2014, 09:20:19 PM »
चर्चा चालू आहे!"

"झाली का हो युती तुमची?"
"चर्चा चालू आहे!"
उबगला महाराष्ट्र अवघा
"चर्चा चालू आहे!"

निवडणूका घोषित झाल्या
"चर्चा चालू आहे!"
दोन दिवस उरले केवळ
"चर्चा चालू आहे!"

अलग-अलग लढतोय आम्ही
"चर्चा चालू आहे!"
झाले मतदान लागला निकाल
"चर्चा चालू आहे!"

जुळले नाही संख्या गणित
"चर्चा चालू आहे!"
झाला शपथविधी आमचा
"चर्चा चालू आहे!"

विश्वासमत जिँकले आम्ही
"चर्चा चालू आहे!"
आम्ही सत्तेत तुम्ही विरोधी
"चर्चा चालू आहे!"

सर्व प्रश्नाचे उत्तर एकच
"चर्चा चालू आहे!"
लवकरच होईल युती आमची
"चर्चा चालू आहे!"

---राजेश खाकरे
  Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता