मी तर कॉमन मैन...![/u]

स्वतंत्र भारत देशाचा शूर मी सरदार,
कटित माझ्या समशेर परंतु सदैव असते म्यान...
गुंग असे स्वताःतच मी, न मजला कसले भान,
मी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...! ॥२॥
घड्याळच असते आयुष्य माझे, घड्याळ ठरवी दिनमान,
काट्यावरती भूक विसंबली, काटेच शमवी तहान...
पैसा असे दैवत माझे, पैसा असे ईमान,
महिन्या अखेरचा पगार ठरवी माझे समाधान...
मी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...! ॥२॥
सुभाष,बाबा,भगत माझ्या धड्यांमध्ये विराजमान,
परि आठवते न पुण्यतिथी,न त्यांच्या जयंतीचे मज ज्ञान...
चाहता मी तर बॉलीवूडचा, रसिक क्रिकेटचा फैन...
मी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...! ॥२॥
मूकपणे मी सहन करतो घोटाळ्यांची घाण,
सुस्कारातच मनात कुजबुजतो अण्णा तुम्ही महान...
दहशतीच्या बळीनकडे पाहून करतो भुवया लहान,
चारदोन अश्रू आणि कॅन्डल्स जाळतो क्षणिक छान...
मी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...! ॥२॥
.........महेंद्र