Author Topic: आरे आवरा याला!  (Read 888 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
आरे आवरा याला!
« on: November 12, 2014, 12:06:04 PM »
मात्रा मोजत जन्म अख्खा सरला साला
शेर…. परंतु एकही ना जमला त्याला

वजनी बोली फारच त्यांनी वापरली हो
पण शेराचे वजन जसे पाचोळा पाला

काल रातीचे खाणे पिणे फारच नडले
तरी सकाळी जुलाब नाही…..शेरच झाला

हे गझलेचे कागद त्याचे…... रद्दी साली
करा सुरनळी आणि तयाच्या  **त घाला

वेड लावतो तीळ प्रियेच्या मानेवरचा
ह्रिदय छेदतो पार तिच्या नजरेचा भाला

केदार…

वरील रचनेतील पहिला शेर माझे फेबु मित्र Kishor Mugal … यांचा आहे. त्यांच्या या शेरात असा काही तडका होता कि मोह आवरला नाही आणि मग काय झालं त्याच वर्णन माझ्या तिसर्या शेरात आलंच आहे. मजेचा भाग सोडून द्या. पण खरोखरच वरील कडवी मला spontaneously सुचली आहेत आणि त्यात काना मात्रा वेलांटी काहीही न बघता मी ती तशीच्या तशी पोस्टली आहेत. (किशोर भौंची परवानगी घेऊन. अर्थात मी आधी हे शेर (?) प्रतिक्रियेत पोस्टले आणि मग परवानगी मागितली. हे म्हणजे घरात शिरल्यावर परवानगी मागण्या सारखे होते. पण किशोरभौनी परवानगी दिली आणि आता ते मी इकडे मांडलं आहे.)  जे लिहिलंय ते आवडलं तर या ''गझल स्ट्रगल''चं श्रेय किशोर भाऊंचे आणि नाही आवडलं तर माझ्या ''घरावर गोटे''.
 

Marathi Kavita : मराठी कविता

आरे आवरा याला!
« on: November 12, 2014, 12:06:04 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):