Author Topic: संक्रांती निमित्त असंच काहीसं!  (Read 875 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
पतंग तुमच्या कवितांचा, उंच आकाशी उडूद्या
ढील द्याया Likeचा.... मला जमिनीवर राहुद्या :D

मारा चालला तिळगूळाचा, फेबु अन whatsup वर
जमवलेला तिळगूळ आता, निवांत मला खाउद्या  :P
 
वर्ष सरलं माझं तुम्हाला, Like देण्यात साल्यानो!  >:(
यंदातरी पोस्टीला माझ्या, Likeची सेन्चुरी गाठूद्या

तीळ नाही चावाया अन ......गुळ महाग मुंगीला
यंदा तरी साहेब उसाला .......भाव बरा भेटूद्या   :(
 
केदार...

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
wahhh wahh...  like hi nahi sir...  suppeer like.....  :)