कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्या.....!
हा केवळ एक संदेश आहे...कुणाचे मन दुखावल्यास कृपया क्षमा असावी...!

"
आला रे आला, गोविंदा आला....!"

आला रे आला, गोविंदा आला,
बालगोपाळ सारा हर्षित झाला...
हंडी फोडण्यात रंगून गेला,
बक्षिसाच्या खैरातीत दंगून गेला...
भान उंचीचे न राहिले याला,
७..८..९....अरे आकाशी गेला...
स्पर्धेचे स्वरूप आले उत्सवाला,
माखन-लोण्याचा बाजार झाला...
लाखोंची किंमत मिळे हंडीला,
गोविंदा मात्र हंडीपेक्षाही स्वस्त झाला...
फिक्सिंग आणि सेटिंगचा इथेही धंदा आला,
गोविंदाचा न्यारेपणा जातोय लयाला...
हंडीवर हंडी सर करत गेला,
जमिनीचा पडे जणू विसरच त्याला...
हंडीच्या नादात तोल ढासळला,
साज-या क्षणी अनर्थ झाला...
असे हे दृश्य नको दिसायला,
म्हणूनच सांगणे आहे गोविंदाला...
विसरून स्पर्धा,फक्त आनंद देण्याला,
निर्मळ,सुरक्षित गोविंदा खेळा...!
.....महेंद्र