Author Topic: "टीम इंडियाचे वाभाडे...!"  (Read 2106 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
"टीम इंडियाचे वाभाडे...!"
« on: August 22, 2011, 11:29:18 PM »
 
:'("टीम इंडियाचे वाभाडे...!":'(

झाले पानीपत आमुचे, No.1 चे ताजाही गेले,

भारतभूचे कागदी घोडे इंग्लिश खाडीत पार बुडाले...

गंभीर,सेहवाग,रैना,लक्ष्मन,सचीनचेही न काही चालले,

ब्रेसनन,ब्रॉड आणि जामिसमोर सा-यांनीच लोटांगण घातले...

स्ठ्रौस,कूक,बेल न के.पी. सारेच आपल्या समाचारास आले,

अर्धमेल्या गोलंदाजीचे त्यांनी छान लक्तर काढिले...

बेसूर भज्जी आणि इन्जुरड जहीरने टीम इंडियाचे कंबरडे मोडले,

एकटी 'भिंत' करणार काय, जेव्हा सगळेच छप्पर पडले...

कसे रे हे अनपेक्षित घडले.....?,

कुणास फॉर्म,तर कुणास दुखण्याने ग्रासले...

अति क्रिकेटचे हे परिणाम सारे, कि IPL चे साईडइफेक्ट झाले...?

कुणास ठावूक काय झाले...पण सारे वैभव धुळीस मिळाले,

अन क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाचे वाभाडे निघाले...!

                                                          ..........महेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता