दिवस माझे हे फुलायचे
काही झाले कि रडायचे
दिवसभर मी झोपायचे
रात्री आईला उठवायचे
सर्वांनी कौतुक करायचे
चड्डीत सु सु करायचे
गाई गाई मला करायचे
तोंडात बोटाला चोकायचे
चड्डी न घालता फिरायचे
सगळ्यांच्या कडेवर बसायचे
टेडीबेअर सोबत खेळायचे
प्राण्यांचे आवाज काढायचे
चमचाने मंम प्यायचे
घोडा घोडा मी खेळायचे
झोपाळ्यात पडून झुलायचे
अंगाई ऐकत झोपायचे
कधी मग गोड मी हसायचे
सर्वत्र ख़ुशी पसरायचे
दिवस माझे हे फुलायचे
रडायचे किंवा हसायचे
-स्वप्नील वायचळ