Author Topic: फेबु वरचा तिचा फोटो (अर्थात एक विडंबन हझल)  (Read 1195 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
लगावली : गागाल गाल गागा/  गागाल गाल गागा
मात्रा : १२ + १२

टाकून रोज येथे, फोटो नवे नवे तू
कातील घाव देते,  रंभा मदालसे  तू

लाईक देत जातो, ना वाचताच ओळी
फोटो तुझा परंतु, हटवू नको गडे तू

कॉमेंट छान येथे, मिळतील गें तुला…  पण
टाकू नकोस फोटो, नवर्या, मुलां सवे तू 

आलो न काल येथे, पुरला न वेळ मजला
येथे अनेक मैना, गं एकटी नव्हे तू

झाले कितीक वेडे, दिलफेक या छबी ने
फोटो जसा तशी पण, दिसतेस ना सखे तू?

पाहून केस काळे,भुलतील ते परंतु
सरले किती उन्हाळे, सांगू नको खरे तू

केदार…