*अंत दिसेना, या दुःखाला*
जळली ती वात, तेलाच्या समईत|
दु:ख देण्यामध्ये, काल हा सराईत||
हृदय का असे, पिळवटून निघाले |
काळाच्या गर्तेत, हरवून गेले ||
समाज हा असा, दु:ख देणारा |
दुधावरची साय, स्वतः खाणारा ||
या देवाला हे, दिसत का नाही |
आधार स्वतःला, मिळत हा नाही ||
डोळ्यापुढे का आहे, अंधार दाटलेला |
अंधारापुढे दिसत नाही, प्रकाश लोटलेला ||
दुःख का आहे, मनात लपलेले |
जीवनात का आहेत, नाती जपलेले ||
वारयावर हलती, जीवनाची पाती |
दुःखाच्या गर्तेत, जीवनाची पोती ||
सोडून गेले, स्वजन सारे |
निष्फळ वाटती, जीवनाचे पसारे ||
फुल सुगंधित, फांदीच्या आधारावर |
जळलेले मन, मृत्युच्या काठावर ||
अंत दिसेना, या दुःखाला |
दिसे फक्त अंत, या जीवनाला ||
प्रयत्न म्हणे, वात पाहतोस कशाला |
झ्हुगारून दे, या दु:खी निशेला ||
सुख-दुःख येती, जसे दिवस-रात्र |
प्रत्येकाच्या जीवनात, बदलती हे सत्र ||
-सोमनाथ