*लग्ना नंतर एक दिवस*
अरे उठ सकाळ झाली आणि सॉरी आज तुझी बहीण बिना डब्याची हॉस्पिटला गेली
मी काय करणार तुझ्या शोभत आम्ही पण रात्र भर क्रिकेट ची match पाहिली
तुझा फोन वाजत होता मी तो उचला तुझ्या त्या दोन मित्रांनी नेहमीच्या ठिकाणी बोलावले
आज ठरवले होतेना त्या कॉलेज च्या बहिणीला भेटायला जायचे
तुझी ती प्रियशी दिसली होती तिच्या नवऱ्या सोबत आली होती माझ्याच हॉस्पिटलमध्ये चेकअप साठी
आणि ते समजलं हा तुझ्या त्या क्रश च पण लग्न ठरलं तिने गावाला पत्रिका वाटली
माझं ऐकत नाही तर मी माहेरी जाईन अस अजिबात बोलणार नाही
माहेरी गेल्यावर माझ्या वेढ्या नवऱ्याची मला सारखी आठवण येत राहील
आठवत का रे तुला ते सर्व
काय दिवस होते ते आपले नाही नाही म्हणता कस कधी आपलं लग्न झालं
आवरलं तुझं जरा थांबतो मी पण येते
मला हॉस्पिटलमध्ये सोड आणि रात्री न्यायला पण ये
हा घे डबा माझ्या नंदेला हॉस्पिटलमध्ये नेऊन दे
मग जा कुठे ते आणि संध्याकाळी लवकर घरी ये
10/10/2022