Author Topic: Asthir Mann  (Read 699 times)

Offline PriyankaZade

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Asthir Mann
« on: September 15, 2015, 11:31:07 PM »
अशी एक अनोळखी वाट…
जावे का तिकडे,  वाटे हा ध्यास
नको पण, कसला हा लोभ?
का बर मन पळते सैरभैर?
कोणी का याला थांबवत नाही ?
समाधान का याला नाही ?
कधी स्वप्ने गुंफून ठेवायची
परंतु होण्याची स्वप्ने नाही बघायची
अशी एक अनोळखी वाट… 
जावे का तिकडे, वाटे हा ध्यास
कधी वाटे असे व्हावे कधी तर तसे… 
का  हे स्थिर नाही, का हे शांत नाही ?
कधी  शंका येई, वाईट होणार का काही !
जर गेलो त्या वाटेवर,  वाढेल का माझी इच्छा ?
जर नाही झाली पूर्ण, होईल परत का त्रास?
नको तरी जायुया एकदा, परंतु नको पूर्ण होण्याची इच्छा
फक्त होईल तेवढा त्रास, परत येईल पाऊलवाट… 
अशी एक अनोळखी वाट…
« Last Edit: September 15, 2015, 11:31:31 PM by PriyankaZade »

Marathi Kavita : मराठी कविता