Author Topic: रेशमाच्या बाबांनी :D  (Read 4341 times)

Offline dhanaji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91
रेशमाच्या बाबांनी :D
« on: January 06, 2012, 02:54:54 PM »

शांताबाई शेळक्यांचे "रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी" जाहीर माफी मागून..


रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहेकोण आहेकोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाबा म्होऱ्यात
आणि माझ्या नरडीला धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

-- Unknown

ADMIN EDIT : हे विडंबन  केशवसुमार (अनिरुद्ध अभ्यंकर ) यांचे आहे
« Last Edit: January 05, 2013, 10:48:51 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: रेशमाच्या बाबांनी :D
« Reply #1 on: April 13, 2012, 02:59:24 PM »
lay bhari  :D :D

केशवसुमार

  • Guest
Re: रेशमाच्या बाबांनी :D
« Reply #2 on: January 04, 2013, 06:21:12 PM »
हे विडंबन  केशवसुमार (अनिरुद्ध अभ्यंकर ) यांचे आहे .. कृपया तसे नमूद करावे

« Last Edit: January 05, 2013, 10:48:59 AM by MK ADMIN »