Author Topic: नातं  (Read 2610 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
नातं
« on: March 15, 2013, 02:02:40 PM »
नातं

नाती असतातच अशी!
कधी वाटतात ती ओझी!
तर कधी वाटतात ती हवीहवीशी!

नात्यांत  - नातं
असतं एक नातं;
आई अन मुलाचं!
त्या चिमुरड्याला;
आई जपते सदैव;
तळहातावरच्या फोडासारखं !
कुशीत तिच्या
मिळते त्याला;
कधी प्रेमाची ऊब
तर कधी;
मायेची उशी!
तिने रोज गायलेली
अंगाई ऐकत-ऐकत
तो केव्हा गाठतो
तारुण्यरेषा;
तिला कधी ते कळतंच नाही!

आता त्याला मिळते एक सखी;
डोळ्यांवर त्याच्या चढते धुंदी;
अन दृष्टिआड होते;
मायेची ती उशी!

आता सैल होतं एक नातं;
अन घट्ट जुळतं  दुसरं  नातं !
आता एक नातं  असतं  ओझं;
तर दुसरं नातं वाटत हवं-हवंस!

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता

नातं
« on: March 15, 2013, 02:02:40 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

arundhatigunjkar

 • Guest
Re: नातं
« Reply #1 on: April 07, 2013, 12:11:11 PM »
        KAVITA VASTWIK PARISTITLA DHARUN AAHE PAN YAT PARIVARTAN GHADWANE MULACHAYA HATAT AAHE TYANE DONHI NATE JAPALECH PAHIJE

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: नातं
« Reply #2 on: April 08, 2013, 12:38:52 PM »
chan

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: नातं
« Reply #3 on: April 09, 2013, 09:49:28 AM »
केदार दादा धन्यवाद! :)

अरुंधती ताई, तुम्ही म्हणता तसे बरोबर आहे, पण बहुतेक असे होत नाही हीच खंत आहे! :( :( :(

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: नातं
« Reply #4 on: May 22, 2013, 04:21:46 PM »
पण तिच्या मायेची सावली  कधी पारखी होत नसते ,
कारण तो तिच्या साठी नेहमीच अल्लड बाबल्या असते .
        छान ,मस्त कविता !!!!!

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: नातं
« Reply #5 on: May 22, 2013, 04:26:18 PM »

sweetsunita

अगदी बरोबर आहे!!!! :) :) :)

धन्यवाद!

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: नातं
« Reply #6 on: May 22, 2013, 04:49:57 PM »
ek mulgi ji pudhe chalun AAI honar ahe tich TYALA AAI-BAPA  pasun dur karate.....tari apan mhanato "Stri mahan ahe"

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: नातं
« Reply #7 on: May 22, 2013, 05:07:05 PM »
                      अनिरुद्ध……………  :) तू तरी शहाण्या मुलासारखा कुडियो [मुलींपासून ]दूर राहा म्हणजे कमावलं । मुलांची अक्कल काय गहाण असते काय ?ok  its all right ……………….

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: नातं
« Reply #8 on: May 22, 2013, 05:08:05 PM »
प्रशांत!
खरे आहे …
पण जेव्हा ती आई होते तेव्हा ती आपल्या पिल्याला कधीच दूर करत नाहि……

अरे नाती अशीच असतात …… गुंतागुंतीची …….
कळतच नाही कधी, केव्हा कुठल्या वळणावर आपली साथ देतील, कधी साथ सोडतील ……
आपण त्यात म्हणून जास्तच गुंतू नये, त्रास शेवटी आपल्यालाच होतो .........

don't worry! Be happy!!!! :) :) :)
« Last Edit: May 22, 2013, 05:10:05 PM by मिलिंद कुंभारे »

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: नातं
« Reply #9 on: May 22, 2013, 05:11:36 PM »
प्रशांत……………. तू तरी शहाण्या मुलासारखा कुडियो [मुलींपासून ]दूर राहा म्हणजे कमावलं । मुलांची अक्कल काय गहाण असते काय ?ok  its all right ……………….

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):