Author Topic: धुळ इथली वाढत आहे  (Read 1842 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,267
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
धुळ इथली वाढत आहे
« on: November 23, 2013, 10:25:58 AM »
धुळ इथली वाढत आहे... 


कवी ग्रेस यांचे 'भय इथले संपत नाही' ऐकण्यात आले. रोज उठून काम धंद्यासाठी बाहेर जावे लागते, आणि बदलापुरला जेथे आम्ही रहातो तेथे आता रस्त्याची कामे सुरु आहेत, त्या मुळे रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे, खुप धूळ, माती असते, त्यावरून पुढील ओळी सुचल्या...... (अगोदर  विडंबन-कविता देत आहे व नंतर मूळ कविता संदर्भासाठी देत आहे)

कविवर्य श्री माणिकराव गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांची क्षमा मागून, विडंबन - भय इथले संपत नाही

धुळ इथली वाढत आहे  मज खोकला, सर्दी होते
बाहेर रोज मी जातो येतो  डोकेही माझे दुखते !!

ते काम हलक्या प्रतीचे ती मातीच धुरळा सारी
वाटेने त्याच जात होतो करण्या पुन्हा तीचती वारी !!

ठेकेदार तोच सावळा सारे काम एकटा घेतो
इतरांना काहीच काम नाही बाकींना ठेंगा देतो !!

ठेक्यात पालिका अवघी  सर्वत्र कुजबूज चाले
भ्रष्टाचार थांबत नाही पण्यात पैसे कि गेले !!

-----------------------------------------
भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

Marathi Kavita : मराठी कविता