Author Topic: भेट तुझी माझी ...  (Read 1866 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
भेट तुझी माझी ...
« on: December 20, 2013, 11:41:13 PM »
कवीवर्य श्री मंगेश पाडगावकर यांचे खुप गाजलेले गीत 'भेट तुझी माझी ... ऐकत लहानाचा मोठा झालो, कॉलेज काळातील दिवस आठवत होते, जुन्या आठवणीत रमता रमता हे विडंबन सुचलं ... (अगोदर  विडंबन-कविता देत आहे व नंतर मूळ कविता संदर्भासाठी देत आहे)

कविवर्य श्री पाडगावकर सरांची क्षमा मागून, विडंबन - भेट तुझी माझी ...

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
एसी युक्त हॉटेल होते गर्दीहि ती लोकांची

प्रखर उजेड नव्हता तेथे, कसलाच न पसारा
आनंदात होते सारे, आनंदची होता सारा
मला मुळी नव्हती चिंता, होणाऱ्या खर्चाची

हाती घेऊन दोन ग्लास, अदबीनं वेटर आला
वाकुनिया कमरेमध्ये, काय आणु असे म्हणाला
लागलीच ऑर्डर दिली, आण प्लेट समोस्याची

केसांमध्ये फुले होती, गालावरी तुझ्या लाली
पाहून रूप तुझे, येई स्मित माझ्या गाली
श्वासालाही ओढ होती आपल्याच स्पर्शाची

घेऊन अलगद आपण, हातामध्ये आपुलेच हात
हलकेच ठेऊन बिल, वेटरचाही गेला हात
खुप वेळ आता झाली, शपथ पुन्हा येण्याची
--------------------

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची

गीत: मंगेश पाडगावकर, संगीत: यशवंत देव, स्वर: अरुण दाते

Marathi Kavita : मराठी कविता