Author Topic: शुर नाही सरदार आम्हाला लाज वाटते किती?  (Read 2768 times)

Offline vikrantborse

  • Newbie
  • *
  • Posts: 12
विडंबन....

शुर नाही सरदार आम्हाला लाज वाटते किती?

शुर नाही सरदार आम्हाला लाज वाटते किती?
देव, देश अन धर्माचीही होत असे अशी माती!
शुर नाही सरदार आम्हाला लाज वाटते किती? || ध्रु ||

आईच्या गर्भात उमगते लाच खाण्याची रीत
पैशांशी हे लगीन लागत जडते येडी प्रीत
लाख संकट देऊनही हे पुढे करती छाती
देव, देश अन धर्माचीही होत असे अशी माती ! ... || १ ||

झुंजवावे अन काटून मारावे हेच तुम्हाला ठाव
लढवून मारावे मारून जगाव हेच तुम्हाला ठाव
पैशापायी सारी इसरला माया ममता नाती
देव, देश अन धर्माचीही होत असे अशी माती ! ... || २ ||

--रत्नप्रवि--