Author Topic: वाद  (Read 977 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
वाद
« on: September 23, 2014, 10:40:40 AM »

आघाडीतील वाद
युतीवर अवलंबून आहे
युतीचा वाद हा
मुख्यमंत्रीपदावर अवलंबून आहे

मुख्यमंत्री कोण होणार
जनता ठरवणार आहे
तरीही निकालानंतर ५ वर्षे
जनताच रडणार आहे

राजकारणाचे वर्तुळ
गोलगोल फिरत आहे
वर्तुळात मात्र जनताच
खरी फसत आहे

राजकारण सत्तेचा
हाच खरा वाद आहे
युती आघाडीच्या वादात
जनताच बरबाद आहे


प्रविण रघुनाथ काळे
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता