Author Topic: स्वच्छतायान...  (Read 961 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,267
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
स्वच्छतायान...
« on: October 03, 2014, 02:06:47 PM »
स्वच्छतायान...

स्वच्छता पुन्हा पुन्हा
संकल्प असा सुटला,
कसं, करावं म्हणता
लोकांचा धीर तुटला !

एका दिवसा साठी
जोश सर्वत्र पसरला,
फोटो काढून घेणारया
लोकांचा बाजार भरला !

स्वच्छ कपडयां हाती
आधुनिक झाडू आला,
लगबग पाहून त्यांची
सफाईगार पण हसला !

तेंव्हा चष्म्यातून बापुंना 
भारत स्वच्छ दिसला,
चौकटीत प्रयोग फत्ते,
चौकात खेळ फसला !

©शिवाजी सांगळे


Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: स्वच्छतायान...
« Reply #1 on: October 30, 2014, 02:21:08 PM »
छान आहे..!

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,267
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: स्वच्छतायान...
« Reply #2 on: October 31, 2014, 10:11:43 AM »
thanks satish....