Author Topic: भिखारी आणि जनता  (Read 1016 times)

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
भिखारी आणि जनता
« on: October 12, 2014, 11:51:42 PM »
मतांची भिक मागणाऱ्या भिकाऱ्यांना फक्त खूर्ची दिसली
मत देणारी जनता मात्र कधी दिसलीच नाही..

लाखांत मोजलेली संपत्ती यांची;
वर्षादोन वर्षात कोटीत गेली
हि कोडी जनतेला कधी सुटलीच नाही..

कुणी म्हणे युपी, बिहारी कुणी गुजराती
तर कुणी महाराष्ट्राचाही झाला
फुट पाडली यांनीच; समता, बंधुता यांनी पाहीलीच नाही..

एकाने शेतकऱ्यांना खाल्लं, दुसऱ्याने कोळसा
एका कुटुंबाने अख्खा देश खाल्ला
हे जनतेला कधी कळलच नाही..

घोटाळे, भ्रष्टाचार, हत्याकांड सर्व यांचेच
जाती धर्माच्या नावावर धिंडवडेही यांचेच
होरपळणारी जनता यातून कधी सुटलीच नाही..

शिवाजी, शाहू, फुले आणि आंबेडकर
यांचे फक्त त्यांनी फोटोच लावले
समाजाबद्दलची विचारधारा यांना कधी समजलीच नाही..

सुमित ९८६७६८६९५७

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Re: भिखारी आणि जनता
« Reply #1 on: October 30, 2014, 02:25:47 PM »
Classic..!