Author Topic: वृत्ती  (Read 790 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
वृत्ती
« on: January 04, 2015, 12:58:08 PM »
मानलेल्या देवतांची
कसली ही अमाणूष वृत्ती,
स्वार्थासाठी जिवघेणे
कसली ही अमाणवीय वृत्ती...

त्यागूनी मंत्र लोकसेवेचा
कसली ही स्वार्थ वृत्ती,
जिवनाशी खेळण्याची
कसली ही वेदनीय वृत्ती...

देव स्थानि स्थापिले तरी
कसली ही राक्षसिय वृत्ती,
कठीण केले जगणे आता
कसली ही मरणीय वृत्ती...

कठीण केले मरणे आता
कसली ही दाहक वृत्ती,
पडलाय सवाल साऱ्यांना
कसली ही वैद्यकीय वृत्ती...

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता