Author Topic: मराठीतच बोल  (Read 919 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
मराठीतच बोल
« on: February 27, 2015, 07:42:21 PM »
मराठी माणूस ठरला
मराठीतच फोल
बोल वेड्या बोल
मराठीतच बोल !

इंग्रजी बोलण्याची
लय त्याला खाज
आई बाबा बोलण्याची
वाटते त्याला लाज !
मराठी मातीतच
मराठी शब्द मेला
दूरदर्शन सारखा
दूर दूर गेला !
तुक्या नाम्याच पीटारं
आता तरी खोल
बोल वेड्या बोल
मराठीतच बोल !!

महाराष्ट्र चा त्याने
केला महाराष्टा
मराठी असून मराठीची 
करतो बघ चेष्टा !
मराठी बोलणाऱ्याला
समजलं जात गावंढळ
इंग्रजी बोलणारा मात्र
होउन बसतो अजगळ !
इंग्रजीच्या नांदापायी
गेला मराठीचा तोल
बोल वेड्या बोल
मराठीच बोल !!

इंग्लिश भाषा सोपी
मराठी वाटते रिस्की
देशीच्या जागेवर
आली इंग्रजाची विस्की !
मराठीत शिक्षण म्हणजे
वाटते सर्वाना जोकिंग
कामवाली बाई पण पाहिजे
सर्वाना इंग्लीश स्पीकिंग !
जाग मराठी माणसा
नाही तर वाजेल तुझा ढोल
बोल वेड्या बोल
मराठीतच बोल ! !


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता