Author Topic: बार बार  (Read 641 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,240
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
बार बार
« on: March 08, 2015, 11:16:30 AM »
बार बार

रात्र जीवन असावे कसे ?
सरकारी अभ्यास सुरू आहे,
झाले जरी नुकसान संस्कृतीचे
तिजोरीत भरच पडणार आहे !

अाधीच मुंबईत स्वकीयांची
गर्दी फार बोकाळली आहे,
नादात आंतरराष्ट्रीय सिटीच्या
परदेशी गर्दी वाढवायची आहे !

मुंबईवर प्रेम करणा-यांची
परकीय संख्या फार अाहे,
मदिरामुक्तीच्या रेटया मध्ये
आधुनिकता बार बार आहे !

हुतात्मा स्मारकाला वंदन
आता काेण करणार आहे?
येणा-या पिढीच्या काळात
त्याचा विसर पडणार आहे !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

बार बार
« on: March 08, 2015, 11:16:30 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):