Author Topic: आता तरी सुधर  (Read 835 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
आता तरी सुधर
« on: March 15, 2015, 09:49:34 PM »
अरे सुधर गड्या सुधर
ऐक जरा बाबांची वाणी
या पक्षातून त्या पक्षात
का उडतो बेंडक्यावानी ! !

आजवर बाबांचे नाव घेऊन
तू केले काय आठव
आंबेडकरी प्रबोधन तू
आता तरी मनी साठव ! !

बाबांचे विचार तुझ्या
कधी येणार तरी अंतरी
कितीही याचना केल्या तरी
ना बनणार तू मंत्री ! !

किती जणांचे पाय धरसील
तू चिटकुन कुत्र्यावानी
या पक्षातून त्या पक्षात
का उडतो बेंडक्यावानी ! !


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता

आता तरी सुधर
« on: March 15, 2015, 09:49:34 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):