Author Topic: मुर्दाडांचे आयुष्य जगणे मी बंद केले  (Read 800 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
मुर्दाडांचे आयुष्य जगणे
आज मी बंद केले
जाती धर्मा विरोधात
आज मी बंड केले
मानव जातीलाच माणसात विभागून
ज्याने माणसाचे खंड केले
बसून त्यांच्या मानगुटीवर
आज मी त्यांना थंड केले !

मी ना हिंदू ना मुस्लिम
ना उच्च ना शूद्र
मानवता हाच माझा धर्म
सारे मानव माझे मित्र
जाती जातीत विभागून
भिक्षुकशाहीने मज अंध केले
म्हणूनच
मुर्दाडांचे आयुष्य जगणे आज मी बंद केले !

देव ही संकल्पना
मी मनातून काढत आहे
फुले शाहू आंबेडकरी विचार
मी साऱ्या समोर वाढत आहे
स्वर्ग, नरक, पाप, पुण्य
त्याला वापस वर धाडत आहे
जातिवाद पेटवीनारे विचार
आज मी मनोमन फाडत आहे
काल्पनिक विचाराने मज आजवर षंड केले
म्हणूनच
मुर्दाडांचे आयुष्य जगणे आज मी बंद केले !


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


Kishor Nanaware.

  • Guest
मित्र खुप सुंदर विचार आहेत .....
तुझ्या विचारानवर तू चालत रहा थांबू नाको.....
तुझी गरज आहे सगळ्या हयात असलेल्या मानव जातीला..... :)

prasad sawant

  • Guest
कविता चांगली आहे. विचार असे विद्रोही अन निर्भीड हवेत. अभिनंदन !