Author Topic: या जगात कोणी कोणाचे नसते  (Read 1417 times)

Offline Gajendra Valvi

  • Newbie
  • *
  • Posts: 9
सुखाचे सोबती तर सगळेच असतात
मात्र दुःखाचे सोबती तर कोणीच नसते
म्हणूनच आज वाटून आले
या जगात कोणी कोणाचे नसते

आज मन खुप उदास होत
तुझ्याशी तरी थोड बोलाव अस वाटत होत
पण तू पण खुप व्यस्त असतेस
तेह्वा पुनःवाटले या जगात कोणी कोणाचे नसते

मी मात्र नेहमी असतो तुझ्यासाठी
खुप नाही पण थोड़ बोलली असतीस माझ्यासाठी
आज मला हरल्या गत वाटते
खरच या जगात कोणी कोणाचे नसते

आता वाटते की नको कोनाचा खोटा आधार
नको कोणाची साथ
स्वार्थी बनून गेलेल्या या जगात असेच असते
खरच या जगात कोणी कोणाचे नसते

गजेंद्र वळवि