Author Topic: खुप झाल आता, मी सहन करणार नाही  (Read 803 times)

Offline Gajendra Valvi

  • Newbie
  • *
  • Posts: 9
आता मी सहन करणार नाही

ओफिसातलि कटकट आता नकोशी होई
नेहमीचच झालय या लोकांच
खुप झाल,आता मी सहन करणार नाही

मान राखतो सीनियर्स चा
म्हणून मी काही बोलत नाही
खुप झाल,आता मी सहन करणार नाही

जूनियर म्हणून किती राबयच
मी का माणुस नाही?
खुप झाला आता, मी सहन करणार नाही

कितीही केल तरी निंदा ही होई
गप्प बसण मला जमणार नाही
खुप झाला आता, मी सहन करणार नाही
खुप झाला आता, मी सहन करणार नाही

गजेंद्र वळवि