Author Topic: बेजार माणुस  (Read 474 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
बेजार माणुस
« on: April 24, 2015, 02:58:03 PM »
फूल नाय माझी दाढी
दिसत्यात हो खुर्डे खुर्डे
दिसाड फिरवुन वस्तरा
गाल झाल्यात हो खरबुर्डे

डोक्याची बी केस गेली
कंगवा ही सुखावला
चार चौघात जाता म्हणे
दिवसा चंद्र उगवला

बसुन बसुन कामात माझ्या
वाढला पोटाचा नगारा
गाडीला ही वाटे माझ्या
वाढलाय लय ढिगारा

टककलाची फॅशन ठेवली
कुणी म्हणत लय भारी
पोटाच्या डायट साठी
खातो फक्त चहा अन खारी

(रविंद्र कांबळे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता