Author Topic: आजकालचे लग्न  (Read 803 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
आजकालचे लग्न
« on: May 14, 2015, 03:32:51 PM »
बिना दारूचे लगीन नसे
साऱ्या लग्नात दारू दिसे
दारू पिऊन बेवडा घुसे
करी साऱ्याला वेडेपिसे ! !

बेवडे सारे वरपक्षी असे
हळूहळू नवरदेवात कॉटर घुसे
चैन अँगूठीसाठी पुन्हां रूसे
वधू पक्षाची धावपळ सुटे ! !

नाचन्याविना पर्याय नसे
भांगड्यात होती सारे वेडेपिसे
धांगड धिंगा साऱ्या गावात दिसे
थांबविण्या त्यांना पर्याय नसे ! !


band वाला मात्र थकून बसे
मारण्या तया सारा वरपक्ष दिसे
भांडणाची ठिणगी तेथून उठे
मांडवदारी सारी रडारड असे ! !

आजकालचे लग्न असे कसे
संजयही साला परेशान दिसे
म्हणून मी कुण्या लग्नात नसे
Whatsapp वरच आशीर्वाद चांगला दिसे ! !संजय बनसोडे
9819444028

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Avi_Friendz

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: आजकालचे लग्न
« Reply #1 on: May 17, 2015, 08:22:34 AM »
barobar bhavu...