Author Topic: कधी जाग येईल?  (Read 542 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
  • Gender: Male
कधी जाग येईल?
« on: May 23, 2015, 01:46:05 PM »

केस कापाया बाळाचे बोकड्या लागे देवीला,
धन काढाया गुपीताच जीव द्यावा लागे बाळाला,
एवढ्याशा नवसाला पोतराज होई,
अस कसा देव ज्याला माणुसकीच नाही...

पोथी-पुराण वाचे त्याला देई हो आसरा,
दिस-रात कामकरी नाही त्यासी थारा,
पोटा-खळगी सोडून वाट्टोळ हो झाला,
याच्यापाई संसार बघा मातीत गेला.

गावातला पोतराज,डोंगरातली यल्लू माय,
काय सांगू तुम्हा त्या जोगत्याचे हाल,
जीव दमडीचा पर त्याला मोल काय?
देवामुळे झाला हो हा बुवा मालोमाल...

पोटचा घास काढुन जवा नवस फेडतो,
बेशरम माणूस तवा माणुसकी विसरतो,
आपल्याशा भल्यासाठी घेतो परक्याचा जीव.
देवा सांग तुला तेव्हा का नाही येत कीव?

पुरा करुन नवस जवा घरात हे येतो,
देवा तु त्याला माफ का करतो?
पशु अन् सोन्याचा बळी घेऊन,
देवा त्यांच्या संग तू भांडून
माणसासारख वागा का नाही सांगत?

Marathi Kavita : मराठी कविता