ज्याकडे खोट्या चमत्काराचा झरा
अशा ढोंगी साधुना आवरा
असे साधु येती घरा
दारे खिडक्या बंद करा !!
खंगलेले भंगलेले
वासनेत रंगलेले
आजकालचे साधु दिसती
नशेत दंगलेले !
बोल परमेश्वराचे मुखी
असती वाईट त्यांच्या नजरा
असे साधु येती घरा
दारे खिडक्या बंद करा !!
ठेवती सर्वावर धाक
मूठ मारून काढती राख
दहा दहा बायकांची घरात रास
बोलती जना, मी घेतला संन्यास !
दिसता असा खोटा साधु
तिथेच त्याला बेदम मारा
असे साधु येती घरा
दारे खिडक्या बंद करा !!
साधु शिरजोर साधु चोर
अशा साधूचा पोलीसांना घोर
पाप करती, बलात्कार करती
सांगति भक्तजना, मी फार थोर !
अशा साधुजना
दुरुनच नमस्कार करा
असे साधु येती घरा
दारे खिडक्या बंद करा !!
संजय बनसोडे
9819444028