Author Topic: अच्छे दिन ???  (Read 634 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
अच्छे दिन ???
« on: May 29, 2015, 11:06:52 AM »
वर्ष पुरे झाले
डोळे झाले ओले
तरीही ना आले
अच्छे दिन

झाल्या निवडणूका
खुर्ची ही मिळाली
तरी नाही जवळी
अच्छे दिन

झाल्या मोठमोठ्या
घोषणा जाहीर
जनता पाहील
अच्छे दिन

बहू आस दिली
स्वप्ने दाखवली
येईल जीवनी
अच्छे दिन

लोक सारे बिचारे
पुन्हा एकदा भुलले
मनी संतापले
अच्छे दिन

लोकांचे नाही आले
मात्र एक झाले
नेत्यांचे ते आले
अच्छे दिन
  --- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


prabhawati

  • Guest
Re: अच्छे दिन ???
« Reply #1 on: May 29, 2015, 08:39:08 PM »
Modi sathi acche din,samanyasathi nahi