तू जातीचा आतंकी
फैलवीतो फक्त आतंक
क्रूर सारे अंगज तुझी
रक्त पाडण्या झाले दंग !!
दिन दुबळा तुला फसे
दुःख ना त्याचे तुला दिसे
तुझ्या धर्मजाळ्यात फसे
दुसरा ना त्याला मार्ग दिसे
हळूहळू दाखवी तू रंग !
तू जातीचा आतंकी
फैलवीतो फक्त आतंक !!
डंक मारण्याची तुझी वासना
दिन दुबळ्या ती दिसेना
धर्म तुझा असा कोणता ?
संजयास काही समजेना
बुद्धीमानही तुझ्या चरणी
त्याची वाटे मज खंत !
तू जातीचा आतंकी
फैलवीतो फक्त आतंक !!
कवी - संजय बनसोडे
9819444028