Author Topic: राजकारणी गोम  (Read 818 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
राजकारणी गोम
« on: July 22, 2015, 08:57:12 AM »
राजकारणी गोमेला
भ्रष्टाचारी पाय आहेत

जनता उकळते दुधावानी
खाणारे हे साय आहेत !

साऱ्या कामात मिलावट
अंगावर मात्र अस्सल खादी

रात दिवस करती लुटालूट
देशाची केली बरबादी !

आतून सर्वच चोर गुंड
जनतेसमोर गरीब गाय आहेत

जनता उकळते दुधावानी
खाणारे हे साय आहेत !

संजय बनसोडे - 9819444028

Marathi Kavita : मराठी कविता