Author Topic: तू आणी मी  (Read 1035 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
तू आणी मी
« on: September 24, 2015, 07:24:14 PM »
आग तू पण विस्तव मी आहे
काल्पनिक तू पण वास्तव मी आहे !!


रडवतोस तू पण हसवणारी भाकर मी आहे
सोन्या चांदीचा तू पण त्याचा चाकर मी आहे !!


गरीबांचा भक्षक तू पण सक्षम मी आहे
देवांच्या आड दैत्य तू पण रक्षक मी आहे !!


थोंताडाच्या वाणीतून तुझी मानवी डोक्यात चढ़ाई आहे
म्हणूनच तुझी माझी आज अस्तित्वासाठी लढाई आहे !!


तू कालही नव्हता, आजही नाही, आणि येणारही नाही
परंतु दुःख हेच, तू मानवाच्या डोक्यातून जाणार ही नाही !!


संजय बनसोडे -9819444028

Marathi Kavita : मराठी कविता