नुकतीच संदीप खरे यांची "लव्ह लेटर" हि कविता वाचण्यात आली . त्यावरून इन्स्पायर होऊन हि कविता मी केली आहे, हे कुठल्याही प्रकारचे विडंबन नसून निव्वळ करमणूक हाच त्या मागचा उद्देश आहे.
आपल्या प्रतिसादांचे स्वागत आहे
बॉस म्हणजे बॉस म्हणजे बॉस असतो
सदासर्वकाळ डोक्याला तो "शॉट" असतो
चांगल्या कामात चुका सदैव तो शोधत असतो
फायर करायला मात्र नेहमी तो तत्पर असतो
बॉस म्हणजे बॉस म्हणजे बॉस असतो
"दिमाख का दही " करण्यात तो मास्टर असतो
"अप्रिसिअशन" करण्यात तो कंजूष असतो
ब्लेम करण्यात सगळ्यात पुढे असतो
"डिसिप्लीन" बद्दल स्वतः तो बेफिकीर असतो
आपल्या बाबतीत मात्र तो कायदेमूर्ती असतो
"सबोर्डीनेत " वर उगाच रुबाब झाडीत असतो
स्वताच्या खोट्या स्तुती वर खुश मात्र तो होत असतो
कसाही असला तरी शेवटी तो बॉस असतो
त्याच्या छत्रछायेखाली आपण मात्र सुरक्षित असतो
अमर