संदीपदा व सलीलदा यांची माफ़ी मागून........
कमळाच्या पात्यावर टप्पोरे हे दव
नारळाच्या अंगावर सोनेरी ही लव
नारळाचे झाड़ कसे भिड़ते नभास
कमळाच्या पात्यावर हिऱ्याचा आभास
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते ?
धूम धूम तरारा धूम धूम तारारा धूम धूम तारारा धूम तारा
दाटलेले धुके अन भरले आकाश
डोंगराच्या भवतीने ढगांचे या पाश
वारा उपटे झाड़ तरी गवत ना उडे
कोसळते वीज अन आभाळाला तडे
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते ?
धूम धूम तरारा धूम धूम तारारा धूम धूम तारारा धूम तारा
वारा का वाहतो अन झाड़ का झूलते
कोवळया या कळीतून फूल का फूलते
काळ्या काळ्या सुर्वनटाचे रंगीत पाखरू
शेणी सारवल्या गोठ्यामध्ये जन्मते वासरू
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते ?
धूम धूम तरारा धूम धूम तारारा धूम धूम तारारा धूम तारा