*।। भूक ।।*
आज भूक निघून गेली ।
कुठे गेली,
कोणास ठाऊक ।
परत येतो म्हणून गेली
परतल्यावर कसली भूक असेल
कोणास ठाऊक ।
पोटाची, मनाची, अंगाची या खिशाची
कधीही मिटता न मिटणारी
भूक ।
कधी स्वप्नात
कधी अलीकडची
कधी स्वप्नाच्या पलीकडची
भूक ।
इने ल संध्येची,
शशीस लाटांची,
कवीस कवितेची,
रतीस कामाची
भूक ।
परतल्यावर कसली भूक असेल
कोणास ठाऊक ।
भूक।।
पवन गुडि
पुणे
९८२३२७३९२२