(कै. माधव ज्यूलियनांची माफी मागून)
मराठी असे हो आमुची मदर्टंग
जरी आज ही किंग्ज् लॅंग्वेज नसे
नसो आज प्राॅस्पेरिटी या मदर्ला
सक्सेसची पुढे ब्राईट प्राॅस्पेक्ट असे
मराठी असे हो आमुची मदर्टंग
जरी डिफ्रंट रिलीजन्स फाॅलो करू
हार्टांत अमुच्या भिनले ब्रदऱ्हुड
हिच्या राइस्प्लेटीत डिनर करू
हिचे सन्स आम्ही हिचे लोन फेडू
वसे आमुच्या हार्टटेंपलवरी
वर्ल्ड-रेकग्निशन हीस मिळवून देऊ
हिला बैसवू ऑप्युलन्सच्या शिरी