निरागस
तुझे असणे...आम्हाला खास आहे
प्राप्ती तुझी एक मात्र हव्यास आहे
करू खरं खोटं आम्ही तुझ्या साठी
साराच रे सत्तेसाठी अट्टाहास आहे
फिरते सत्ता..सगळी तुझ्या भोवती
खुर्ची देवी सर्वां तुझाच ध्यास आहे
तुजपुढे नातीगोती, सारी नितीमत्ता
कुणा सांग...कसला पायपोस आहे
आली राज्ये गेल्यात कित्येक सत्ता
स्थान कायम तुझे हे निरागस आहे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९