चाल : ( दोस्त कविता, कवी इंद्रजीत भालेराव माझी एक गाय होती तिला होत वासरू, याच कवितेवर आधारित )
माझ्या मालकाचा एक कुत्रा होता नाव होतं मोती
मालक त्याच्यावर खूप प्रेम करायचे सांगू किती किती?
अंडे मटन आणून द्यायचे रोज त्याला खायला
ताज ताज दूध द्यायचे रोज त्याला प्यायला
मला मात्र भाकर खायला मिळत होती
सोबत होती चटनी अन् कधी तिही मिळत नव्हती
मोतीसाठी राहायला छोटे घर होतं
आत होती मऊ गादी अन् पाणी प्यायला मडक होतं
मला एक कोपरा होता तेथे मी झोपयचो
पांघरुन चटई काही नव्हते तहान लागली कि तडफडायचो
मोतीला मालक हाक मारायचे मोठ्या प्रेमाने
मोतीला जवळ घ्यायचे कुरवळायचे मायेने
मला मात्र हाडतुड अन् शिव्या सुद्धा मिळायच्या
काही झाली चुक तर मार खावं लागायचा
मोती मालकाबरोबर बागडायचा त्याना प्रेमाने चाटायचा
शेपटी हलवत नेहमी मालकाच्या मागेच असायचा
मला मात्र मालक कधी प्रेमाने बोलले नाही
जवळ घेणे दूरच नीट बघितलेही नाही.
आज जेव्हा पाह्तो मी मोतीचे लाड होतांना
माणसापेक्षा जनावरांवर प्रेम करतांना
असं वाटते मी का माणूस म्हणून जन्मलो
बर झालं असतं जर मी जनावर झालं असतो.