Author : प्रकाश राजे
देवा कशी रचलीस रे माझ्या जीवनाची कहाणी
आईबापाच प्रेम कधी कमी पडलं नाही
पण गरिबीन मात्र कधी साथ सोडली नाही
शिक्षणात कधी मी कमी पडलो नाही
पण बेरोजगारीने मात्र माझी पाठ सोडली नाही
सुखाच्या शोधात निघून गेली ...माझी सारी जवानी
देवा कशी रचलीस रे माझ्या जीवनाची कहाणी
या कर्जाच्या डोंगरापुढे शेती विकण्याशिवाय आता पर्याय पण नाही
जेवढी शिल्लक राहील तेवढ्यात पोठ भरण्या इतकं पिकतही नाही
त्यात पाऊस नाही पडला तर होते फक्त पाहाणी
देवा कशी रचलीस रे माझ्या जीवनाची कहाणी
वाळून गेलंय माझ्या लेकराच मनगट
त्यात आलंय या महामारीच संकट
आतातर आटून गेलंय माझ्या डोळ्यातलं पाणी
देवा कशी रचलीस रे माझ्या जीवनाची कहाणी
या महामारीमुळ सोडलीय आता शरिरान साथ
माहित नाही कधी विजेल या आयुष्याची वात
या मरणाच्या दारात लेकरांना बघताही येत नाही
देवा कशी रचलीस रे माझ्या जीवनाची कहाणी
तूच सांग देवा कोणाला ठरवायचं दोषी
आणि कोणाला द्यायची फाशी
सांग काय चूक त्या लेकरांची
जे माझ्यामागे आता मरतील उपाशी
काय उत्तर देऊ तिला , आता एकटी पडेल माझी राणी
देवा कशी रचलीस रे माझ्या जीवनाची कहाणी
नाही परवडणारा मला हा विकतचा श्वास
दवाखान्याच्या बिला एवढं नाही माझ्या हातावर मास
देवा भरेल का रे पोट लेकरांच
या सरकारच्या तांदूळ आणि गव्हाणी
देवा कशी रचलीस रे माझ्या जीवनाची कहाणी
काय करेल हा गरीब बिचारा ...आता सोडतो हा प्राण
या भ्रष्टाचारी लोकांपुढे आज टेकतो मी मान
बाबांनो पुतळे उभारण्यापेक्षा आधी संपवा ही गरिबी
येऊदे पुण्याईची कमाई तुमच्याही नशिबी
तुमच्या तिजोरीमुळ होतीय आता जीवनाची हाणी
मानावा कशी रचलीस रे माझ्या जीवनाची कहाणी