राज -कारणाच्या पोटी -म्हाताऱ्याची दाटी
-----------------------------------
अननुभवी नवशिकी वर्तमान पिढी
नुसता बोलाचाच भात बोलाचीच कढी
म्हणून की काय राजकारणाच्या पोटी
अनुभवी , कर्तव्य -कठोर म्हाताऱ्याची दाटी
पाऊणशे वयोमान , हातामध्ये काठी
तोंडाचे बोळके , अधुमय दृष्टी
अहो चालेल आम्हाला , अतिअनुभवी
लोणच्यागत मुरलेल्या म्हातार्याची दाटी .
हाता -पायांस कापरे , अंगातून गेले वारे
डोईवर टक्कल आता वर्णन पुरे
राजकारण चालवाया झालीय आता
मुरंब्यागत मुरलेल्या म्हाताऱ्याची दाटी .
राजकारणात भरलेत असे सारे -तारे
सत्तरीवरले पंच्याहत्तर ऐशी म्हातारे
केव्हा तुटतील नेम नाही
केव्हा निखळतील पत्ता नाही .
भ्रम नाही , अर्थ नाही बोलण्याचा
लढता येत नाही , वेग मंदावलाय चालण्याचा
तरी तोल जाता जाता
तोल सांभाळताहेत ते राजकारणाचा .
हे असेच पुढे घडणार
हे असेच पुढेही चालणार
जोवर असेल तरुणांची कमतरता
राजकारणात म्हाताऱ्याची संख्या वाढणार
-------श्री अतुल एस परब
दिनांक- रविवार - (16.05.2021)