पोटचा गोळा....
पोटच्या गोळ्याला दारातच सोडलं अन, हातावरच पोट भरायला काळीज उन्हात धावलं
उन्हातान्हात घाम गाळून निम्मं काम सरलं, तान्ह्याच्या आठवणींच गुराळ पोटातच मुरलं
भाकरीतुकडा खाता खाता पोरगं कानांत रडलं,
लागलीच घेऊन येते म्हणून काळीज आतानं वरडलं
ईतभर खळगी भरण्यात वेचलं आयुष्य सारं,
पोरगं शिकून श्यान मोठा हाफीसर हुइल रं
पोरगं धाडलं शाळला घेतलं नवं पुस्तक दप्तर,
धन्याच्या डोईवर पडलं घरचं मोठं खापर
एक एक म्हणत सरल्या साऱ्या येत्या,
घरचं कल्याण करणाऱ्या आठवणी मनात मात्र हुत्या
आता काही मनात आस नाही र राहिली,
माझ्या हाफीसर ला नवी बाहुली पहिली
दिवस सरलं, कष्ट हारलं नातवासनि खेळवताना
खचलं आमचं मन, तुमचं तुमी बघा ऐकताना
काळानं घात केला, मेला सगळा लळा
पोटच्याच गोळ्याला राहिला नाही कसलाच कळवळा
कसलाच कळवळा......
©गुरुदत्त